महत्वाच्या घडामोडी

सारथी चे केंद्र राजर्षी शाहू मिलच्या जागेवरच व्हावे- मराठा ऑर्गनायझेशन

MahaNews LIVE
Jun 23 / 2021

सारथी चे केंद्र व मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी विचारे माळ परिसर राजाराम महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ परिसर या ठिकाणी करण्याचे विविध नेतेमंडळींनी पर्याय समोर ठेवले तथापि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने राजारामपुरी परिसरामधील राजर्षी शाहू मिल सध्या रिकामी आहे तसेच या मिलची जागा 28 एकर आहे यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक सारथी चे कार्यालय मराठा विद्यार्थ्यांचे मुला-मुलींचे वस्तीगृह व स्पर्धा परीक्षा केंद्र याच बरोबर भव्य ग्रंथालय अभ्यासिका राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचे कृषी केंद्र अशा विविध योजना एकत्रित या जागेत शासनाने केल्यास महाराष्ट्रासाठी एक वेगळा आदर्श असेल तरी शासनाने इतर कोणत्याही जागा न बघता शाहू मिल ही जागा सारथी कार्यालय वसतिगृहासाठी आरक्षित करावी ही मागणी मराठा ऑर्गनायझेशन तर्फे करण्यात येत आहे तसेच याबाबतचे निवेदन माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय पालकमंत्री यांना देण्यात येणार आहे अशी मागणी ऋतुराज माने, राजवर्धन बिरंजे, मंदार पाटील, अभिजीत राऊत, अजय शिंदे,केदार माने, प्रथमेश देसाई, सिध्दांत गुडाळे यांनी केली आहे

सारथी चे केंद्र राजर्षी शाहू मिलच्या जागेवरच व्हावे- मराठा ऑर्गनायझेशन
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *