महत्वाच्या घडामोडी

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसतील 2000 रुपये त्यांनी...

MahaNews LIVE
May 15 / 2021

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि मोदी सरकारने या योजनेअंतर्गत पाठवलेला हप्ता अद्याप तुम्हाला मिळाला नसेल तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मोदी सरकारने काल म्हणजेच 14 मे रोजी या योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला आहे. ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तांतरित केली. 2000 रुपये या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्या शेतकऱ्यांपैकी तुम्ही देखील असाल आणि तुम्हाला अद्याप मदत मिळालेली नाही, तर तुम्हाला चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. काही हेल्पलाइन क्रमांक सरकारने जारी केले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही तक्रार दाखल करून शकता. त्याचबरोबर तुम्ही लेखापाल किंवा कृषी विभागाच्या संपर्क करू शकता. हेल्पलाइन नंबर 011-24300606 / 011-23381092 यावर संपर्क करू शकता. याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) चा ई-मेल (Email) pmkisan-ict@gov.in यावर देखील संपर्क करू शकता.

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसतील 2000 रुपये त्यांनी...
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *