जगावेगळे

पिकासो यांच्या पेंटिंगची तब्बल ७५५ कोटींना विक्री

MahaNews LIVE
May 15 / 2021

करोनाच्या संकटामुळे जगभरातल्या मोठमोठ्या अर्थव्यवस्थांना हादरे दिले आहेत. अनेक अर्थव्यवस्थांनी मोठ्या घसरणींचा सामना देखील केला आहे. यातून जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकाही सुटली नाही. अजूनही करोनामुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट कमी झालेलं नाही. मात्र, याचा कोणताही परिणाम जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या पेंटिंगच्या लोकप्रियतेवर झालेला नाही. नुकत्याच झालेल्या एका लिलावातून ही बाब स्पष्ट झाली आहे. कारण पिकासो यांच्या Women Sitting Near a Window (Marie-Therese या पेंटिंगची तब्बल १० कोटी ३० लाख अमरिकी डॉलर अर्थात भारतीय चलनात जवळपास ७५५ कोटी रुपयांना विक्री झाली आहे.

पिकासो यांच्या पेंटिंगची तब्बल ७५५ कोटींना विक्री
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *