महत्वाच्या घडामोडी

कळंबा कारागृहातील दोन कोरोनाबाधित कैद्यांचं पलायन

MahaNews LIVE
May 14 / 2021

कोल्हापुरमधील कळंबा कारागृहातील दोन कोरोना बाधित कैद्यांनी आयटीआय गोविंद सेंटरमधून धूम ठोकली आहे. खुनाच्या गुन्ह्यात अंडर ट्रायल हे दोन कैदी होते. काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना आयटीआय गोविंद सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते. या दोन कोरोनाबाधित कैद्यांनी उपचार सुरू असलेल्या कैद्यांनी रात्री साडेबारा वाजता खिडकीचे गज कापले आणि तेथून पसार झाले. याप्रकरणी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही पळून जाताना अन्य कैद्यांनी आरडाओरडा केला असता, सुरक्षारक्षकाने बॅटरीचा प्रकाश ज्योत टाकून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या पोलिसांच्या डोळ्यादेखत कैदी पसार झाले. दोन कैदी पसार झाले कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

कळंबा कारागृहातील दोन कोरोनाबाधित कैद्यांचं पलायन
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *