कोल्हापूर

गोकुळचे अध्यक्षपद कोणाला मिळणार या बाबत उत्सुकता ?

MahaNews LIVE
May 13 / 2021

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) नूतन चेअमनपदाची निवड शुक्रवारी (दि. १४) होणार आहे. गोकुळ मध्ये १७ विरुद्ध चार असे सत्तांतर झाले. संचालकांमध्ये नव्या चेहऱ्यांना मोठ्या संख्येने संधी मिळाली आहे. सत्ताधारी आघाडीत विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे हे दोघे जुने आणि संघाच्या कारभाराशी परिचित असलेले संचालक आहेत. दोघांपैकी एकास चेअरमनपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे, तरी पहिला कोण, याबाबत ‘गोकुळ’ वर्तुळात उत्सुकता आहे. तत्पूर्वी आज गुरुवारी दुपारी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ या दोघांची बैठक होणार आहे. यावेळी नूतन संचालकाची ही मते आजमावली जाणार आहेत. त्यानंतर बैठकीत चेअमनपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

गोकुळचे अध्यक्षपद कोणाला मिळणार या बाबत उत्सुकता ?
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *