कोल्हापूर

शिवसेनेतर्फे शुक्रवारी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल समोर उपोषण

MahaNews LIVE
May 13 / 2021

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोणाचा प्रार्दुभावामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा मृत्यु दरात आघाडीवर आहे. स्वतःच्या सोईसाठी गोकुळची निवडणुक लावणारे पालकमंत्री यांनी यासाठी काय केले? ते स्पष्टपणे निष्क्रिय ठरले आहेत. जिल्हातील उच्चांकी मृत्युला जबाबदार पालकमंत्री असुन त्यांना जाब विचारणेची वेळ आली आहे. म्हणुन आम्ही सोशल डिस्टंसिग पाळून पालकमंत्र्यांची नामुष्की जनतेसमोर उघडीस आणण्यासाठी कदमवाडी येथे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या दारासमोर उद्या दिनांक १४ मे रोजी सकाळी १०.०० वाजता एक तासाचे लाक्षणिक उपोषण शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना कोल्हापुर शहर प्रमुख रविकिरण विष्णूपंत इंगवले यांनी निवेदनाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.

शिवसेनेतर्फे शुक्रवारी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल समोर उपोषण
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *