कोल्हापूर

कोल्हापुरात महारक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबीर

MahaNews LIVE
May 12 / 2021

कोल्हापूर मध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठा ऑर्गनायझेशन आणि डॉ. प्रवीण कोडोलीकर वाढदिवस समिती यांच्यामार्फत महारक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. १४ मे रोजी सकाळी ८. ३० वाजल्यापासून या शिबिराला सुरुवात होणार असल्याची माहिती आयोजकाकडून सांगण्यात आले आहे. महालक्ष्मी लॉन, प्रतिभानगर कोल्हापूर येथे हे शिबीर होणार असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान तसेच प्लाझ्मा दान करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

कोल्हापुरात महारक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबीर
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *