थोडक्यात महत्वाचे

दिशा पटानीच्या ओठांवर टेप लावून सलमान खाननं दिला किसिंग सीन

MahaNews LIVE
May 11 / 2021

सलमान खान त्याचा आगामी चित्रपट राधेः योर मोस्ट वॉण्टेड भाईमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून यातील सलमान खान आणि दिशा पटानीच्या किसिंग सीनची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. किसिंग सीन न देणाऱ्या सलमानने त्याचा इतक्या वर्षाचा नियम कसा मोडला, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. मात्र त्याने या सिनेमात दिशाला किस केले का, याचा खुलासा खुद्द त्याने केला आहे. राधे चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत सलमान खान म्हणाला की, मी दिशाला किस केलेले नाही. मी शूटिंगवेळी केवळ टेपला किस केले होते. मैने प्यार कियाच्या शूटिंगवेळीही मी किसिंग सीन दिला नव्हता. त्यावेळी मी केवळ काचेवर जे लिपस्टिकचे मार्किंग करण्यात आले होते, त्यालाच किस केले होते. त्या सिनेमातील अभिनेत्री काचेच्या दुसऱ्या बाजूला होती.

दिशा पटानीच्या ओठांवर टेप लावून सलमान खाननं दिला किसिंग सीन
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *