महत्वाच्या घडामोडी

14 ते 16 मे दरम्यान अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका

MahaNews LIVE
May 11 / 2021

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, 14 ते 16 मे दरम्यान चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. यंदाच्या मोसमातलं हे या परिसरातलं पहिलं चक्रीवादळ ठरू शकतं. सोबतचा फोटो इन्सॅट उपग्रहानं आज (11 मे रोजी) संध्याकाळी साडेसहा वाजता काढलेला आहे. त्यात अरबी समुद्र आणि विषुववृत्ताजवळ हिंदी महासागरात ढग जमा झालेले दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार पूर्वमध्य समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे वादळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. नागरिकांनी समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. समुद्र व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे," असं रायगड जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

14 ते 16 मे दरम्यान अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *