कोल्हापूर

इचलकरंजी आयजीएम रुग्णालयातील हायफ्लो मशीनला आग

MahaNews LIVE
May 11 / 2021

इचलकरंजी : आयजीएम हॉस्पिटलमध्ये हायफ्लो मशीनला अचानकपणे आग लागली. या घटनेत हायफ्लो मशीन जळून खाक झाले. या मशीनवरील उपचार सुरू असणाऱ्या बाधित रुग्णाला त्वरित जम्बो सिलिंडरच्या साहाय्याने प्राणवायू देऊन सुखरूप स्थळी हलवले. दुपारी बाराच्या सुमारास ही आग लागली. या मशीनच्या जळण्याने अतिदक्षता विभाग मध्ये धुर झाला होता. सुरक्षारक्षक व परिचारिका यांच्या प्रयत्नांमुळे अतिदक्षता विभाग पूर्वस्थितीत आणले. मात्र या घटनेने आयजीएम रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरले होते.

इचलकरंजी आयजीएम रुग्णालयातील हायफ्लो मशीनला आग
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *