कोल्हापूर

भाजपातर्फे सी.पी.आर, सावित्रीबाई फुले रुग्णालय याठिकाणी मोफत चपाती-भाजी वितरण उपक्रम

MahaNews LIVE
May 09 / 2021

कोल्हापूर : ग्रामीण भागातील अनेक रुग्णांवर शहरातील मोठ्या रुग्णालयात उपचार सूरु आहेत. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना जेवण मिळण्यासाठी कसरत होताना दिसत आहे. अशा अनेक गरजू लोकांची गरज ओळखून भारतीय जनता पार्टीच्यावतीने विविध सेवाकार्य सुरू आहेत. आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सी.पी.आर रुग्णालय व सावित्रीबाई फुले रुग्णालयात पेशंटच्या नातेवाइकांना मोफट चपाती-भाजीचे वितरण करण्यात आले. आज पासून वरील दोन ठिकाणी सकाळी ११ : ३० वाजता भाजपाच्यावतीने ही सेवा सुरू राहणार असल्याचे आम.चंद्रकांत पाटील यांनी सांगीतले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, भाजपा जिलाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, ग्रामीण सरचिटणीस विठ्ठल पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राउत आदी मान्यवरांच्या हस्ते चपाती-भाजीचे वितरण करण्यात आले.

भाजपातर्फे सी.पी.आर, सावित्रीबाई फुले रुग्णालय याठिकाणी मोफत चपाती-भाजी वितरण उपक्रम
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *