महत्वाच्या घडामोडी

तामिळनाडू; स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

MahaNews LIVE
May 07 / 2021

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून डीएमके पक्षाच्या पारड्यात जनतेचा कौल पाहायला मिळाला. 234 विधानसभा मतदारसंघांपैकी 133 मतदारसंघांमध्ये डीएमके पक्षाने विजय प्राप्त केला. डीएमके पक्षाचे प्रमुख एम.के स्टॅलिन यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टॅलिन यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याअगोदर 34 कॅबिनेट मंत्र्यांची यादी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे सादर केली होती. राज्यपालांनी गुरुवारी ही यादी स्वीकारली आणि आज एम.के स्टॅलिन हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

तामिळनाडू; स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *