थोडक्यात महत्वाचे

शिरोली ; आजपासून चार दिवस जनता कर्फ्यू…

MahaNews LIVE
May 06 / 2021

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरोली येथे ६ मे ते ९ मे पर्यंत चार दिवसांचा जनता कर्फ्यु करण्याचा निर्णय ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन, दक्षता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. शिरोली गावातील व्यापारी, ट्रान्सपोर्ट, दुकाने, हॉटेल सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. तर अत्यावश्यक सेवेमधील मेडिकल्स सकाळी ९ ते १२ : आणि सायंकाळी ६ ते ९ या वेळेत चालू रहणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंतची मुभा देण्यात आली आहे. गावातील प्रत्येक वार्डात टास्क फोर्स कमिटी स्थापन करण्यात आली असून या कमिटीने आपल्या वार्डात गस्त घालून जनता कर्फ्यूची अंमलबजाणी करणार आहेत. असे आवाहन शिरोलीचे सरपंच आणि दक्षता कमिटीचे अध्यक्ष शशिकांत खवरे यांनी केले. यावेळी बैठकीसाठी पोलीस अधिकारी किरण भोसले , विठ्ठल पाटील, ग्रा.पं. सदस्य प्रकाश कौंदाडे, तंटामुक्ती सतिश पाटील, बाजीराव सातपुते, सरदार मुल्ला, संदीप कांबळे, राजु येसुगडे, विष्णुकांत भोसले, जोतीराम पोर्लेकर, उत्तम पाटील, अर्जुन चौगुले, ग्रामविकास अधिकारी भोगम उपस्थित होते.

शिरोली ; आजपासून चार दिवस जनता कर्फ्यू…
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *