थोडक्यात महत्वाचे

राज्य महा एनजीओ समितीच्या अध्यक्षपदी युवराज येडुरे

MahaNews LIVE
May 06 / 2021

कोल्हापूर : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र एन जी ओ समिती ( महाराष्ट्र राज्य ) च्या झूम मीटिंग ऑनलाईन कार्यकारिणी बैठकीत युवराज रामचंद्र येडुरे यांची राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली . ते शेणगाव येथील स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेचे संस्थापंक अध्यक्ष आहेत ते सामाजिक क्षेञात गेली बारा वर्ष कार्यरत आहेत.तसचे गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र एनजीओ समितीच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी चांगल्या पद्धतीचे काम केलेले आहे त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी महाराष्ट्रातील एनजीओनी दिली तसेच समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी डॉ.लक्ष्मी उमेश भारती औरंगाबाद,व राज्य सचिवपदी सचिन प्रकाश यादव,सांगली,व राज्य संपर्कप्रमुख संदिप शिवाजी बोटे, राज्य सदस्य डॉ.प्रियदर्शनी उमेश चोरगे,उषा वंसत देसाई,पुणे,अमोल निवृत्ती गोरे यांची ऑनलाइन निवड प्रक्रिया मध्ये बहुमताने निवड करण्यात आली . नवनिर्वाचित अध्यक्ष युवराज येडुरे यांनी प्रत्येक विभाग प्रमुख व जिल्हा कार्यकारिणीची निवड केली आहे.

राज्य महा एनजीओ समितीच्या अध्यक्षपदी युवराज येडुरे
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *