पेज३

भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी करिश्मा कपूरचा भाज्यांसोबत खेळतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

MahaNews LIVE
Apr 03 / 2021

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सिनेमात झळकत नसली तरीही सध्या सोशल मीडियावर ती बर्‍यापैकी अ‍ॅक्टिव असते. करिश्मा कपूर नेहमीच तिचे फोटो चाहत्यांसह शेअर करत वाहवा मिळवत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. करिश्मा कपूरने इंस्टाग्रामवर नुकतेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लिहिले की, असा शनिवार जातो. जे करायला मला आवडते. भाज्या धुणे आणि वाळवणे. या व्हिडीओत करिश्मा भाज्या उन्हात सुकवण्यासोबत त्यांच्यासोबत खेळताना दिसतो आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 90 च्या दशकात करिश्मा कपूरचा बॉलिवूडमध्ये चांगलाच दबदबा होता. मात्र लग्नानंतर करिश्मा अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. म्हणायला काही वेबसीरिज व जाहिरातीत ती दिसते. पण ते पुरेसे नाही,अशात लोलो इतके लक्झरी आयुष्य जगते तरी कसे? असा प्रश्न चाहत्यांना साहजिकच पडतो.करिश्मा उत्तम अभिनेत्री असल्यासोबत एक उत्तम बिझनेस वुमनही आहे.

भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी करिश्मा कपूरचा भाज्यांसोबत खेळतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल
Categories : पेज३ Tags : पेज३
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *