थोडक्यात महत्वाचे

दुसऱ्या दिवशी ४५ वर्षांवरील ९ हजार जणांनी घेतली लस

MahaNews LIVE
Apr 03 / 2021

कोल्हापूर वयाच्या ४५ वर्षांवरील ९ हजारावर नागरिकांनी शुक्रवारी दिवसभरामध्ये कोविड प्रतिबंधक लस घेतली. केंद्र शासनाच्या नव्या निर्देशानुसार ही कार्यवाही होत असून नागरिकांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील २२० केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी पुरेसा लसीचा साठाही कोल्हापूर जिल्ह्यात आहे. दिवसभरामध्ये ४५ वर्षांवरील ९८२७ जणांनी ही लस घेतली असून उद्यापासून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या वयोगटातील ११ टक्के नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात आरोग्य विभाग याच वयोगटावर लक्ष केंद्रित करणार आहे. डॉक्टर्स आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे ९७ टक्के लसीकरण झाले आहे. फ्रंटलाईन वर्कर्सनी लसीकरणामध्ये आघाडी घेतली असून उद्दिष्टांपेक्षा जादा १२ टक्के म्हणजे ११२ टक्के काम झाले आहे. ६० वर्षांवरील ४३ टक्के नागरिकांनी लस घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २९ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून २ टक्के नागरिकांनी दुसरा डोसही घेतला आहे.

दुसऱ्या दिवशी ४५ वर्षांवरील ९ हजार जणांनी घेतली लस
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *