महत्वाच्या घडामोडी

कोल्हापुरात कोरोनाचे शंभरावर नवे रुग्ण पाच जणांचा मृत्यू

MahaNews LIVE
Apr 03 / 2021

कोल्हापूर सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे शंभराहून अधिक रुग्ण नोंदविण्यात आले आहेत, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या पद्धतीने रुग्णांची संख्या वाढत आहे ती पाहता नागरिकांनी खरोखरीच दक्षता घेण्याची गरज व्यक्त झाली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नव्या ११० रुग्णांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील ४५ रुग्णांचा समावेश आहे. आजरा तालुक्यात एक, भुदरगडमध्ये तीन, गडहिंग्लज देन हातकणंगले पाच कागल दोन, करवीर नऊ पन्हाळा चार राधानगरी दोन शाहूवाडी एक नगरपालिका क्षेत्रामध्ये १९ तर अन्य जिल्ह्यांतील १७ जणांचा कोरोना रुग्णांमध्ये समावेश आहे. सध्या ८८९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरामध्ये ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. भुये, ता. करवीर येथील ८० वर्षांच्या वृद्धाचा इचलकरंजी येथील तांबे मळा येथील ६० वर्षांची महिला, हातकणंगलेतील कोळी गल्लीतील ५४ वर्षांचा पुरुष, सांगली जिल्ह्यातील वाळवात तालुक्यातील चिकुर्डे येथील ७८ वर्षीय वृद्ध, शिराळा तालुक्यातील ताडवळे येथील ५६ वर्षीय महिला अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ५०६ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून १२१८ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १८१ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे.

कोल्हापुरात कोरोनाचे शंभरावर नवे रुग्ण पाच जणांचा मृत्यू
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *