महत्वाच्या घडामोडी

कोल्हापूरचा सत्यजीत आणि मारशा यांचा आदर्शवत विवाह पुरोगामी विचारांच्या विवाहाची चर्चा

MahaNews LIVE
Apr 03 / 2021

शाहूनगरीतील सत्यजीत संजय यादव व मारशा नदीम मुजावर या बालपणापासूनच्या सवंगड्यांनी मैत्रीचे रूपांतर प्रेमात केले. थेट घरच्यांची परवानगी घेत एकाच मंडपात मंगलाष्टका व निकाह कबूल असा दुहेरी संगम साधत विवाहाचा बार धूमधडाक्यात उडविला. मुलगा हिंदू अन् मुलगी मुस्लीमधर्मीय अशा पुरोगामी विचारांच्या विवाहाची चर्चा झाली नाही तर नवलच रंकाळा परिसरात राहणारा सत्यजित हा स्थापत्य अभियंता, तर मारशा ही वास्तुविशारद आहे. दोघेही एकमेकांना बारा वर्षांपासून ओळखत असल्याने त्यांनी १९ मार्च २०२१ ला एका हाॅटेलमध्ये एकाच वेळी मौलानांच्या उपस्थितीत मुस्लीम पद्धतीने निकाह केला. त्यानंतर हिंदू पद्धतीने मंगलाष्टका सप्तपदी विधी झाला. दोघांच्याही कुटुंबीय पुरोगामी विचारांचे असल्याने या विवाहास संमती दिली. त्यामुळे सामाजिक दबावाचा कुठलाही प्रकार येथे घडला नाही. घरातील वडीलधाऱ्यांच्या संमतीनेच हा विवाह करण्याचे दोघांनी ठरविले आणि त्याप्रमाणे विवाह थाटामाटात पार पडला.

कोल्हापूरचा सत्यजीत आणि मारशा यांचा आदर्शवत विवाह पुरोगामी विचारांच्या विवाहाची चर्चा
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *