अनेकदा सेम टू सेम कपडे परिधान करत दिसले दीपवीर फनी फोटो पाहून चाहते व्हायचे आवाक्
MahaNews LIVE
बऱ्याचदा रणवीरची हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते. अनेकदा त्याच्या कपड्यांवरून त्याची खिल्लीही उडवली जाते. मात्र रणवीरला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. त्याला जे आवडतं ते तो परिधान करतो सुरूवातीपासूनच आपल्या लूकर विविध प्रयोग करणं आवडतं.त्यामुळे अनेकदा तो अतरंगी ड्रेसिंग स्टाईल करत लक्ष वेधून घेतो. दीपिकाही त्याच्या पाऊलावर पाऊल टाकत सेम टू सेम ड्रेसिंग करताना दिसली आहे.एक नाही दोन नाही तर अनेकवेळा दीपिकाने रणवीर सिंह सारखी स्टाइल केल्याचे फोटो समोर आले आहेत.रणवीरची ड्रेसिंग पाहून सवय झालीय पण दीपिकानेही अतरंगी ड्रेसिंग करणे यापूर्वी कधी पाहिले नव्हते.त्यामुळे दीपिकाला कोण्या अभिनेत्रीची नाही तर पती रणवीर सिंहच्या स्टाइल अंदाजाची भुरळ पडल्याचे पहायला मिळतं.विशेष म्हणजे दीपवीर यांनी त्यांच्या लग्नातही मिळते जुळते स्टाइल लूकचे कपडे परिधान केले होते.

- Comments
- Leave your comment