गडहिंग्लज साखर कारखाना ब्रिस्क कंपनी जाणार मग कोण येणार
MahaNews LIVE
ब्रिस्क कंपनीच्या विनंतीनुसार गडहिंग्लज साखर कारखान्याचा ताबा १० एप्रिलपर्यंत संचालक मंडळाकडे सोपविण्याचा आदेश सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार यांनी बुधवारी (३१ मार्चला) दिला. त्यामुळे ब्रिस्क जाणार हे नक्की झाले. परंतु त्यानंतर कारखाना चालविण्यासाठी दुसरी कंपनी येणार की संचालक मंडळ स्व:बळावर कारखाना चालविणार याकडे गडहिंग्लजसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. २०१३-१४ मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक अरिष्टात सापडलेला हा कारखाना शासनाच्या आदेशानुसार ब्रिस्कला ४३ कोटीच्या बदल्यात १० वर्षांसाठी सहयोग तत्वावर चालवायला दिला. परंतु कारखान्याची जुनी मशिनरी साथ देत नसल्यामुळे आणि पोषक वातावरण नसल्यामुळे मुदत संपण्यापूर्वीच कारखाना सोडण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याने सहकार खात्याने त्याला मान्यता दिली आहे.

- Comments
- Leave your comment