थोडक्यात महत्वाचे

रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला रंग पिचकारी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

MahaNews LIVE
Apr 02 / 2021

रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी शहरातील प्रमुख चौकांत रंग पिचकारी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता सरकारकडून वर्तविली जात आहे. तरीसुद्धा रंगोत्सवाची जय्यत तयारी करण्यात युवा वर्ग गुंतला होता. मागील वर्षी कोरोनाचा कहर वाढल्यामुळे रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी झाली नाही. त्यामुळे अनेकांनी यंदाची रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा मानस बाळगला होता. मात्र, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे अनेकांनी सावध पवित्रा घेतला आहे.तरीसुद्धा बच्चे कंपनीच्या आग्रहाखातर पालक वर्गाने पिचकारी कोरडे रंग खाद्य रंग नैसर्गिक रंग आदीची खरेदी जोरदार केली आहे

रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला रंग पिचकारी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *