महत्वाच्या घडामोडी

सर्व एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार कोविडवरील लस?

MahaNews LIVE
Mar 30 / 2021

सर्व एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट कोविड १९ वरील लस देण्याबद्दल प्रयत्नशील राहू असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यंनी लॉकडाऊन कालावधीत आपल्या आरोग्याची पर्वा न करता कर्तव्य बजावले आहे. परराज्यातील लोकांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचे काम केले आहे. शिवाय चालक-वाहक वर्गाचा रोज शेकडो प्रवाशांशी संपर्क होत असल्याने इतर वर्गाप्रमाणे सरसकट सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कोविड १९ ची लस देण्यात यावी अशी, मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी सतेज पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला. एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट कोविड १९ ची लस देणे आवश्यक असून त्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेन असे आश्वासन दिलेच शिवाय तातडीने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व शासकीय आरोग्य विभाग यांना फोन करून कार्यवाहीसाठी सूचितही केले. आजच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून कार्यवाही केली जाईल, असेही शिष्ठमंडळास आश्वस्त केले.

सर्व एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार कोविडवरील लस?
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *