महत्वाच्या घडामोडी

मराठी नाट्य परिषदेला राजकारणाची लागण

MahaNews LIVE
Mar 29 / 2021

संपूर्ण जगाला कोरोनाची लागण झालेली असताना इकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला मात्र राजकारणाची लागण झाली आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना मनमानी कारभाराच्या कारणास्तव कार्यकारिणीने पदच्युत केल्यानंतर कोर्टकचेऱ्या सुरू आहे. त्यात रंगभूमी दिनानिमित्त आयोजित शनिवारची सभा रद्द करण्यात आल्याने नियामक मंडळ सदस्यांनी कांबळी व प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांचा जाहीर निषेध केला आहे. नियामक मंडळ सदस्यांनी घटनेप्रमाणे मागणी करूनही प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी सभा ठेवण्यास टाळाटाळ केली. मात्र कांबळी यांच्या विरोधात निकाल गेल्याने पोंक्षे यांनी १७ फेब्रुवारीला परिषदेची सभा २७ मार्च रोजी होईल असे जाहीर केले. ही सभा हंगामी अध्यक्ष नरेश गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार होतील. ज्यात आधीच्या सभेच्या निर्णयांची अंमलबजावणी होणार होती. या कारणास्तव पोंक्षे यांनी शनिवारची सभा कोरोनाचे कारण सांगून रद्द केली. या प्रकारांमुळे नियामक मंडळाच्या सदस्यांनी कांबळी व पोंक्षे यांचा जाहीर निषेध केला आहे.

मराठी नाट्य परिषदेला राजकारणाची लागण
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *