क्रीडा

का दिली नाही हार्दिकला गोलंदाजी विराटच्या उत्तरावर भडकला सेहवाग

MahaNews LIVE
Mar 27 / 2021

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारतीय गोलंदाजांची धुलाई झाली. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पंड्याला गोलंदाजी दिली नाही. विराटच्या या निर्णयावर माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग ने जोरदार टीका केली. दुसऱ्या वनडेत भारताचा ६ विकेटनी पराभव झाला. भारताने विजयासाठी दिलेले ३३७ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ४४व्या षटकात पार केले. हार्दिकने टी-२० मलिकेत पाचवा गोलंदाज म्हणून गोलंदाजी केली होती. पण वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात त्याला चेंडू दिला गेला नाही. विराटच्या या निर्णयावर अधिक टीका यासाठी झाली कारण इंग्लंडचे फलंदाज जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी भारतीय फिरकीपटूंची जोरदार धुलाई केली. विराटकडे सहाव्या गोलंदाजाचा पर्याय होता. जो भारतीय संघासाठी फायद्याचा ठरला असतो.

का दिली नाही हार्दिकला गोलंदाजी विराटच्या उत्तरावर भडकला सेहवाग
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *