महत्वाच्या घडामोडी

काही बोलण्याआधी कॉल करा माझा फोन सुरू आहे इंग्लंडच्या खेळाडूचे गावस्करांना उत्तर

MahaNews LIVE
Mar 27 / 2021

भारताविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने ३३७ धावांचे लक्ष्य ४४व्या षटकात पार केले. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडकडून सलामीवीर जॉनी बेयरस्टोने १२४ धावांची शतकी खेळी केली. या सामन्यातील विजयासह इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी देखील केली. काही दिवसांपूर्वी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी बेयरस्टोला कसोटी मालिकेतील खराब कामगिरीनंतर त्याला या फॉर्मेटमध्ये रुची नसल्याचे वक्तव्य केले होते. आता गावस्करांच्या त्या वक्तव्यावर इंग्लंडच्या सलामीवीरीने त्याच्या स्टाइलमध्ये उत्तर दिले आहे.

काही बोलण्याआधी कॉल करा माझा फोन सुरू आहे इंग्लंडच्या खेळाडूचे गावस्करांना उत्तर
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *