करोना पॉझिटिव्ह सचिन तेंडुलकर पाहा काय म्हटले सोशल मीडियावर
MahaNews LIVE
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला करोना व्हायरसची लागण झाली आहे. सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून स्वत:ला करोना झाल्याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळला होता. या स्पर्धेत सचिनच्या नेतृत्वाखाली भारतीय संंघाने अंतिम सामन्यात श्रीलंकाचा पराभव करत विजेतेपद मिळवले होतेकरोना व्हायरसपासून बचावासाठी मी सर्व खबरदारी घेत होतो. या व्हायरसची काही लक्षणे जाणवल्यानंतर मी चाचणी केली. त्याच रिपोर्ट आला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. घरातील अन्य सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सचिनने पोस्टमध्ये म्हटले आहे. मी स्वत:ला घरी होम क्वारंटाइन करून घेतले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य अशी काळजी घेत आहे.

- Comments
- Leave your comment