तोडफोड, दहशत निर्माण केल्याप्रकरणी माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल
MahaNews LIVE
Mar
23
/ 2021
10K SHARE
10K SHARE
येथील संग्राम चौकामध्ये एका कापड व्यापाराच्या घरावर हल्ला करून वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी माजी नगरसेवकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार चार दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास घडला होता. मिळालेली माहिती अशी, एका कापड व्यापारी याच्या घरावर पाच ते सहा जणांनी दगडफेक करून हल्ला केला होता. यामध्ये कार, बुलेट, स्कुटर व अन्य मोटरसायकलीची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. परंतु संबंधित व्यापाऱ्याने तक्रार दिली नव्हती. शेवटी पोलिसांनीच गुन्हा दाखल केला.

-
- Comments
- Leave your comment