महत्वाच्या घडामोडी

गिफ्ट्स घेऊन करिना-सैफच्या मुलाला भेटायला गेली सारा अली खान

MahaNews LIVE
Feb 26 / 2021

अभिनेत्री करिना कपूर काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली. तिच्या मुलाच्या जन्मानंतर सोशल मीडियावर सातत्यानं करिना त्याचं नाव काय ठेवणार याची चर्चा सुरू आहे. अद्याप याविषयी कोणतीही ऑफिशिअल घोषणा झाली नाही. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी बाळाला पाहण्यासाठी करिना-सैफच्या घरी हजेरी लावलीच आहे. पण या दरम्यान सैफची मुलगी सारा अली खान सुद्धा तिच्या छोट्या भावाला भेटण्यासाठी करिनाच्या घरी पोहोचली आहे. सारा अली खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात हातात खूप साऱ्या गिफ्ट बॅग्ज घेऊन ती करिनाच्या बाळाला भेटण्यासाठी जात असल्याचं दिसत आहे. यावेळी नेहमीच सारासोबत दिसणारी तिची आई मात्र तिच्यासोबत नव्हती. सारा एकटी करिनाच्या दुऱ्या बाळाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली. सारा अली खानच्या अगोदर करिनाच्या बेस्ट फ्रेंड्स आणि काही नातेवाईक सुद्धा करिना आणि बाळाला भेटण्यासाठी आले होते. ज्यात मलायका अरोरा, अर्जुन कपूर, अमृता अरोरा, करिश्मा कपूर, सोहा अली खान, कुणाल खेमू यांचा समावेश आहे. पण साराच्या एंट्रीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या. कारण तसं पाहायला गेलं तर तैमुर आणि त्याचा भाऊ ही साराची सावत्र भावंड आहेत. पण सारा आणि करिना यांच्याही खास बॉन्डिंग आहे. हे अनेकदा दिसून आलं आहे. याशिवाय सारा करिनाची खूप मोठी चाहती सुद्धा आहे. असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्यात सावत्र आई आणि मुलीचं नाही तर मैत्रीचं नातं आहे.

गिफ्ट्स घेऊन करिना-सैफच्या मुलाला भेटायला गेली सारा अली खान
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *