महत्वाच्या घडामोडी

तगडी स्टारकास्ट आणि "८ दोन ७५" चं रहस्य

MahaNews LIVE
Feb 26 / 2021

नावापासूनच वेगळेपण असलेल्या "८ दोन ७५" या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळत असून, नाट्यमय आणि रंजक असा हा टीजर आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीचं कुतूहल आणखी वाढलं आहे. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे . चित्रपटाची पटकथा शर्वाणी पिल्लई आणि सुश्रुत भागवत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत. टीजरमधून हा चित्रपट राजकीय विषयावर असल्याचा अंदाज येतो आहे. तसंच चित्रपटात प्रेमकहाणीही असेल असं जाणवतं. चित्रपटाचा लुकही एकदम फ्रेश आहे. मात्र चित्रपटाच्या कथेत नेमकं काय रहस्य आहे? हे प्रत्यक्ष चित्रपटातच पाहायला मिळेल. त्यामुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

तगडी स्टारकास्ट आणि "८ दोन ७५" चं रहस्य
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *