महत्वाच्या घडामोडी

आभार फाटा ते शाहूनगर रस्त्याची दुरुस्ती कधी होणार

MahaNews LIVE
Feb 23 / 2021

आभारफाटा ते शाहूनगर मार्गे कलानगर ला जोडणाऱ्या रस्ता गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त आहे. शाहूनगर नजीक रस्त्यावर गटारीचे पाणी मुख्य रस्त्यावर सोडले आहे. त्यामुळे शाहूनगर मधील रस्त्यावर गटारीच्या पाण्याचे डबके बनले आहेत. या रस्त्यावरून विध्यार्थीसह, नागरिकांना वाहतूक करताना जीव मुठीत धरून जावे लागत आहेत. रस्त्यातील खड्डे चुकवताना अनेक अपघात रोज घडत आहे.याबाबत आठ महिन्यापूर्वी शाहूनगर मधील सर्वपक्षीयांनी विद्यमान आमदाराना निवेदन दिले होते. त्यांनीही लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. शाहूनगर येथील रस्त्यावरील खड्डे काही महिन्यांपूर्वी एका लोकप्रतिनिधीने बुजवून घेतले होते पण दोन तीन महिने उलटताच रस्त्याची अवस्था पुन्हा बिकट बनली आहे. नागरिकांना आभार फाटा ते कलानगरचे ५ किलोमीटरचे अंतर पार करण्यात सुमारे अर्धा तास लागत आहे. मुख्य मार्गावर कलानगर येथे ड्रेनेजचे काम चालू आहे. त्यामुळे तर या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यापेक्षा नवीन रस्ताच लवकर पूर्ण करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे

आभार फाटा ते शाहूनगर रस्त्याची दुरुस्ती कधी होणार
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *