कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर
MahaNews LIVE
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक प्रशासनाने आंतरराज्य सीमेवर तपासणी पथक उभे केले आहे.कोगनोळी जवळील या सीमेवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करूनच राज्यात प्रवेश दिला जात आहे. शेजारील राज्यांप्रमाणे आपल्या राज्यातही दुसऱ्या टप्प्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सावध पवित्रा घेत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासन करडी नजर ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोगनोळी टोल नाका याठिकाणी कोरोना तपासणी पथकाची उभारणी केल्यानंतर कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य केले असल्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आज प्रांताधिकारी युकेश कुमार यांनी या तपासणी नाक्यास भेट देऊन पाहणी केली व कोरोना निगेटिव प्रमाणपत्र अनिवार्य केले असल्याच्या वक्तव्यास दुजोरा दिला.टोल नाक्यावरून जाणारी वाहने थांबवून प्रांताधिकारी युकेश कुमार यांनी कर्नाटक राज्याने कोविड प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. कोरोना चाचणी करून तसे प्रमाणपत्र घेतले आहे का? अशी विचारणा केली. यावेळी अनेक वाहनधारक याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

- Comments
- Leave your comment