थोडक्यात महत्वाचे

शिवजयंती मिरवणुक : २१ जणांवर गुन्हा गडहिंग्लजच्या नगराध्यक्षांसह

MahaNews LIVE
Feb 22 / 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून शिवजयंतीची मिरवणुक काढल्याप्रकरणी गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्यासह ११ नगरसेवक मिळून २१ जणांवर गडहिंग्लज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तसेच मिरवणुकीतील चित्ररथांच्या १८ ट्रॅक्टरवर देखील कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, नगरसेवक बसवराज खणगावे, राजेश बोरगावे, नितीन देसाई, उदय पाटील, नरेंद्र भद्रापुर, दीपक कुराडे, नगरसेविका सुनिता पाटील, वीणा कापसे, नाझ खलिफा, श्रद्धा शिंत्रे व शशिकला पाटील, प्रकाश तेलवेकर, बाळासाहेब भैसकर, सागर पाटील, शिवाजी कुराडे, इम्रान मुल्ला, विनोद लाखे, लता पालकर यांचा समावेश आहे.

शिवजयंती मिरवणुक : २१ जणांवर गुन्हा गडहिंग्लजच्या नगराध्यक्षांसह
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *