महत्वाच्या घडामोडी

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच करणार स्क्रीन शेअर, जानेवारीपासून करणार शूटिंगला सुरूवात

MahaNews LIVE
Feb 20 / 2021

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचे चाहते त्यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. लव रंजन दिग्दर्शित रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत बहुप्रतीक्षित चित्रपट १८ मार्च २०२२ला होळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली आहे. लव फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी लिहिले की, कॅलेंडरवरील तारखेला खूण करून ठवा. लव रंजनाचा आगामी चित्रपट रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत सिनेमा २०२२च्या होळीच्या मुहूर्ताला म्हणजेच १८ मार्चला भेटीला येणार आहे.लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित, गुलशन कुमार आणि भूषण कुमार प्रस्तुत या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर दिसणार आहेत.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच करणार स्क्रीन शेअर, जानेवारीपासून करणार शूटिंगला सुरूवात
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *