महत्वाच्या घडामोडी

अंबाबाई मंदिर परिसरातून हटवल्यास संघर्ष अटळ

MahaNews LIVE
Feb 09 / 2021

फेरीवाल्यांना सध्या आहे त्याच ठिकाणी पट्टे मारून व्यवसाय करण्यास देण्यात यावे. महापालिकेने जर अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना हटवले तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. महापालिकेने कारवाई केल्यास शहरातील सर्व भाजी मंडई बंद ठेवण्याचीही भूमिका घेतली.महापालिका प्रशासन शहरातील अतिक्रमण कारवाईवर ठाम आहे. मंदिरे, हॉस्पिटल या परिसरातील १०० मीटरमधील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. फेरीवाल्यांचा याला विरोध आहे. यासंदर्भात फेरीवाला कृती समितीने सकाळी शिवाजी चौकात निदर्शने केली. सायंकाळी शिष्टमंडळाने आ. चंद्रकांत जाधव यांची भेट घेतली. अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना हटवल्यास तीव्र आंदोलनाची भूमिका फेरीवाल्यांनी घेतली. आहे तेथेच वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे पट्टे मारून व्यवसाय करू द्यावा, अन्यथा प्रशासनाशी संघर्ष अटळ असल्याचे सर्व पक्षीय कृती समितीचे आर.के. पोवार यांनी म्हटले आहे.महापालिका प्रशासनाकडून मंदिर परिसरातील अतिक्रमणावरील कारवाईवर ठाम आहेत. या उलट फेरीवालेही येथून हटण्यास तयार नाहीत. महापालिकेने कारवाई सुरू केल्यास भाजी मंडई बंदच ठेवू, अशी टोकाची भूमिका फेरीवाल्यांनी घेतली आहे. महापालिका, फेरीवाले यांच्यातील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

अंबाबाई मंदिर परिसरातून हटवल्यास संघर्ष अटळ
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *