करोना काळातही रणवीर सिंग मालामाल,केली कोट्यवधी रुपयांचीकमाई
MahaNews LIVE
बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांच्या यादीमध्ये रणवीरच नाव सामिल आहे. रणवीर त्याच्या उत्तम अभिनयामुळे सातासमुद्रापलिकडे पोहचला. कोरोनासारख्या कठीण प्रसंगातही त्याच्याकडे कामाचा ओघ सुरुच होता. कोरोना काळात जवळपास त्याने नऊ नवे ब्रॅण्ड साईन केले. आणि त्यामुळे त्याला कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे. रणवीर एका ब्रॅण्डचं प्रमोशन करण्यास जवळपास ७ ते १२ कोटी रुपये घेतो. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर जळपास ३४ ब्रॅण्डचं प्रमोशन करत आहे. यामधून त्याने ७० कोटी रुपये कमावले आहेत. रणवीरची वाढती लोकप्रियता पाहून त्याच्याकडे एकापाठोपाठ एक काम येणं सुरुच आहे. त्यामुळे लॉकडाऊनकाळातही त्याने कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. सारं काही ठप्प असताना रणवीरने केलेली कमाई पाहून साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

- Comments
- Leave your comment