महत्वाच्या घडामोडी

रिहाना? कोण बाई आहे ती? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?: राज ठाकरेंचा भाजपवर हल्ला

MahaNews LIVE
Feb 06 / 2021

केंद्र सरकारने देशातील प्रतिष्ठीत व्यक्तींना अशाप्रकारचं ट्विट करायला लावू नये, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी राज यांनी ज्या पॉप सिंगरच्या ट्विटमुळे हा वाद सुरू झाला त्या रिहानावरही जोरदार टीका केली. ( raj thackeray attacks bjp over farmers protest tweet controversy) कोण कुठली रिहाना? कोण बाई आहे ती? तिला का इतकं महत्वं दिलं जातंय? तिनं ट्विट करायच्याआधी तिला कुणी ओळखत तरी होतं का? आणि अशा व्यक्तीनं ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील भारतरत्नांना सरकारनं ट्विट करायला लावणं हे बरोबर नाही असं राज ठाकरे म्हणाले. भाजपनं आंदोलन करायची गरज नाही.कृषी कायद्यांना होणारा विरोध पाहून सत्ताधारी भाजपनं आंदोलन करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही सत्तेत आहात. दिल्लीत बसून तुम्हीच निर्णय घेत आहात मग तुम्हीच आंदोलन का करताय?, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. निवडणूक आली की नामांतर आठवतं का? केंद्र आणि राज्यात जेव्हा शिवसेना-भाजपचं सरकार होतं त्यावेळ औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण का झालं नाही? आता निवडणुकीच्या तोंडावरच हे नामांतराचे विषय कसे निघतात? लोकांना काय मुर्ख समजलात का?, असा रोखठोक सवाल करत राज यांनी औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला. "जेव्हा राज्य आणि केंद्रात भाजप-शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळी औरंगाबाद सोडून इतर अनेक शहरांची नावं बदलली गेली. दिल्लीतील रस्त्यांचीही नावं बदलण्यात आली. मग त्यावेळी औरंगाबादचं नामांतरण का नाही झालं ते आधी सांगा?, असं राज ठाकरे म्हणाले.

रिहाना? कोण बाई आहे ती? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?: राज ठाकरेंचा भाजपवर हल्ला
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *