महत्वाच्या घडामोडी

गडहिंग्लज पंचायत समितीच्या माजी सदस्य मंगलादेवी पाटील यांचे निधन

MahaNews LIVE
Feb 06 / 2021

गडहिंग्लज पंचायत समितीच्या माजी सदस्य मंगलादेवी तात्यासाहेब पाटील (६८, मूळगाव कडलगे, ता. गडहिंग्लज, सध्या रा. संकेश्वर) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शुक्रवारी (दि. ५) सकाळी साडेआठच्या सुमारास निधन झाले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत टी. आर. पाटील यांच्या त्या पत्नी तर बँकेचे विद्यमान संचालक संतोष पाटील-कडलगेकर व प्रगतशील शेतकरी सचिन पाटील यांच्या त्या मातोश्री होत. कडलगे येथील श्री मल्लिकार्जुन नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्या काम पाहात होत्या. दुपारी ४ वाजता कडलगे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.माती सावडण्याचा कार्यक्रम रविवारी (दि. ७) सकाळी ९ वाजता आहे.

गडहिंग्लज पंचायत समितीच्या माजी सदस्य मंगलादेवी पाटील यांचे निधन
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *