कोल्हापूर जिल्ह्यात ईर्ष्येने ८४ टक्के मतदान, कागल तालुक्यात सर्वाधिक
MahaNews LIVE
३८६ ग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने आणि चुरशीने ८३.८० टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. अनेक ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली असून, काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडल्याने काहीकाळ गोंधळ उडाला होता. पण शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड पहावयास मिळाली.सर्वाधिक ९० टक्के मतदान कागल तालुक्यात झाले, तर शाहूवाडी तालुक्यातील पेरीडमध्ये बिनविरोधाची परंपरा खंडित होते म्हणून उमेदवारांसह मतदारांनी मतदानापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने एकही मतदान झाले नाही. शेतकरी वर्गातील मतदार सकाळी लवकर मतदान करून शेतीच्या कामाला जायचे म्हणून मतदार लवकर घराबाहेर पडला होता. त्यामुळे सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी १६.०९ टक्के मतदान झाले. दुपारी ३.३०पर्यंत तब्बल ७३.२२ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५.३०पर्यंत ८३.८० टक्के मतदान झाले.

- Comments
- Leave your comment