कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू, कोल्हापूर शहरात कोरोनाचे नवे १६ रुग्ण
MahaNews LIVE
Jan
13
/ 2021
10K SHARE
10K SHARE
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २५ रुग्ण सापडले आहेत, तर आजरा तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३०३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ८८९ जणांचे स्वॅब घेण्यात आले. १६३ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. दरम्यान, आजरा तालुक्यातील वडकशिवाले येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महापालिका कार्यक्षेत्रात १६, इतर जिल्ह्यांतील १, नगरपालिका क्षेत्रात २, करवीर तालुक्यात ३, राधानगरी तालुक्यात १, गडहिंग्लज तालुक्यात १, असे २५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

-
- Comments
- Leave your comment