महत्वाच्या घडामोडी

३२ लाखांचा बोजा घरफाळा थकबाकीदाराच्या मिळकतीवर नोंद

MahaNews LIVE
Jan 13 / 2021

महापालिकेने मंगळवारी घरफाळा थकबाकीदाराच्या मिळकतीवरच थकबाकी रकमेचा बोजा नोंद करण्याची कारवाई केली आहे. ३२ लाख ७६ हजार इतकी त्यांची थकबाकी होती. हा सर्व रकमेचा बोजा त्यांच्या मिळकतीवर नोंदविण्यात आला आहे. १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिका घरफाळा विभागाकडून वसुली मोहीम सुरू केली आहे.राज्य निवडणूक आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी घरफाळा घोटाळा आणि थकबाकीदारांविषयी प्रश्न उपस्थित केला होता.

३२ लाखांचा बोजा घरफाळा थकबाकीदाराच्या मिळकतीवर नोंद
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *