कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी २ हजार जणांना लस
MahaNews LIVE
केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी (दि. १६) लसीकरण करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील २० आरोग्य संस्था यासाठी निश्चित करण्यात आल्या असून यावर जिल्ह्यातील २ हजार जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. लस पुरवठा करण्यासाठी वाहनेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील १२ ठिकाणी, तर कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात ८ अशा २० ठिकाणी हे लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक केंद्रावर एक लसटोचक, एक पोलीस, एक डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि दोन सहायक अशा ५ कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात येणार आहे.

- Comments
- Leave your comment