महत्वाच्या घडामोडी

कोल्हापूरातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट

MahaNews LIVE
Jan 12 / 2021

राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व महापालिकेच्या रुग्णालयासह शहरातील खासगी ३०३ रुग्णालयांची तपासणी होणार आहे. आपत्कालिन स्थितीसाठी त्यांच्याकडून काय उपाययोजना केल्या आहेत, याची तपासणी केली जाणार आहे. आगप्रतिबंधक साधनसामग्रींची मोडतोड झाली असल्यास अथवा कमतरता असल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. भंडारा येथील सरकारी रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील शासकीय पातळीवर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सरकारीसह खासगी रुग्णालयांचेही फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी सोमवारी अग्निशमन विभागाला शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना केल्या आहेत.

कोल्हापूरातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *