प्रचाराचा नारळ फुटला: ग्रामपंचायत निवडणूक प्रचारास प्रारंभ
MahaNews LIVE
जिल्ह्यामध्ये ४३३ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीच्या प्रचाराचा आज प्रारंभ करण्यात आला. ४७ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक हि बिनविरोधी झाली आहे. ग्रामपंचायत मध्ये मात्र पॅनेलमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार यावरून मात्र आजपर्यंत धुमाकूळ चालू होता. काल नारळ ठेवून आज सर्व पॅनल मध्ये गावोगावी प्रचार सुरु झाला आहे. अजेंडा पत्रक , प्रचार पत्रक छापून घेण्यासाठीही प्रिटिंग प्रेस मध्ये मोठी गर्दी होती. प्रत्येक प्रभागातील उमेदवार त्यांचे चिन्ह व त्यांचा अजेंडा असे हे पत्रक डिजाईन करून घेण्यासाठी आर्टिस्टना चांगले काम मिळाले आहे. प्रत्येक गावातील गावकरभारी प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांना आवाहन करत आहेत. रस्ते, वीज, शुद्ध पाणी , फिल्टर हाऊस , घंटा गाडी , गार्डन, व्यायाम शाळा असे गावाचा विकास करण्याचे वचन दिले जात आहे.

- Comments
- Leave your comment