पदवीधर, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरणार
MahaNews LIVE
कोल्हापूर महानगरपालिका सभागृहाची मुदत संपली असून, महापालिकेच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, या निवडणुकीत शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. पदवीधर आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने उद्या शनिवार दि.०७ नोव्हेंबर २०२० रोजी ठीक सांयकाळी ५.३० वाजता गुरुकृपा हॉल, आंबेवाडी, कोल्हापूर येथे पदाधिकारी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची नियोजन बैठक आज शिवसेना शहर कार्यालय येथे पार पडली.

- Comments
- Leave your comment