शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात, अंबाबाईचे ऑनलाइन दर्शन
MahaNews LIVE
नऊ दिवस घरोघरी घट बसवत शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली. दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागतात. देवीची साडेतीन पिठं भक्तांनी फुलून जातात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं भाविकांसाठी बंद आहेत. त्यामुळे शारदीय नवरात्रोत्स यंदा भक्तांशिवाय साजरा केला जाणार आहे. मंदिरांध्ये मात्र विधीवत पूजा कऱण्यात येणार आहे. आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील देवीची विधीवत पूजा बांधली जाते. खरतर आदिशक्तीची विविध रूपं पाहण्यासाठी अंबाबाई मंदिरात भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात. पण मंदिर बंद असल्यामुळे भक्तांना देवीच थेट दर्शन करता येणार नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना देवीच दर्शन करता यावं यासाठी ऑनलाइन दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

- Comments
- Leave your comment