परभणी : उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशीला लाच प्रकरणि 2 दिवसांची पोलीस कोठडी
MahaNews LIVE
परभणी निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह दोन कारकुनांना लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (9 सप्टेंबर) अटक केली आहे. शासनाच्या विशेष रस्ता अनुदानासाठी आलेल्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्यासाठी एकूण निधीच्या दीड टक्के म्हणजे साडेचार लाख रुपये लाच त्यांनी मागितली होती. याप्रकरणी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी आणि इतर 2 अधिकाऱ्यांना परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. परभणीच्या गंगाखेड नगर परिषदेच्या 5 प्रभागांसाठी आलेला 3 कोटींच्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्यासाठी या रकमेच्या दीड टक्के म्हणजेच साडेचार लाखांची लाच निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी मागितली होती. काल (9 सप्टेंबर, मंगळवार) ही साडेचार लाखांची लाच त्यांच्या म्हणण्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून श्रीकांत कारभाजन आणि अभियंता अब्दुल हकीम यांनी स्वीकारल्यानंतर या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली होती.

- Comments
- Leave your comment