महत्वाच्या घडामोडी

मिरामार सर्कलजवळचे बांधकाम संशयाच्या घे-यात

MahaNews LIVE
Sep 04 / 2020

मिरामार समुद्रकिना-या जवळील प्रसिद्ध सर्कलनजिक सध्या रात्रंदिवस चालू असलेल्या एका छुप्या बांधकामामुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हे बांधकाम होत असेल तर त्याबाबतची माहिती देणारा फलक तेथे लावण्याची गरज होती. तसा फलक तेथे नसल्याने या बांधकामाकडे लोक संशयाने पहात असून संबंधित अधिकारणीने या बाधकामाबाबाबत खुलासा करण्याची गरज असल्याचे मत लोक व्यक्त करत आहे. प्रसिद्ध मिरामार समुद्रकिना-याच्या समोरच असलेल्या सर्कलपासून दोनापावलाला जाणा-या आणि तेथून येणा-या अशा दोन रस्त्यांमधील चिंचोळ्या जागेत हे मोठे बांधकाम चालू आहे. त्यास परवानगी देण्यात आली असेल तर त्यासंबंधात कोणी माहितीही देत नसल्याने हे बांधकाम संशयाच्या घे-यात आले आहे. चारही बाजूंनी मोठाले पत्रे लावून रात्रंदिवस हे काम चालल्याने कोणाला तरी हा प्रकल्प बेकायदेशीरपणे लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे, अशीच चिन्हे दिसत आहेत. पणजी महापालिका की पणजीच्या आमदाराच्या आशिर्वादाने हे बांधकाम चालले आहे, असाही प्रश्न काही जण विचारत आहेत.

मिरामार सर्कलजवळचे बांधकाम संशयाच्या घे-यात
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *