महत्वाच्या घडामोडी

मुंबई-पुणेच्या धर्तीवर कोल्हापुरातही जम्बो कोविड सेंटर उभारा -खासदार संभाजीराजे छत्रपती

MahaNews LIVE
Sep 04 / 2020

मुंबई-ठाणे, पुणे च्या धर्तीवर कोल्हापुरातही जम्बो कोविड सेंटर लवकरात लवकर उभे करावे. कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्याला तात्काळ जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावेसुध्दा एक निवेदन त्यांच्या तर्फे पाठवून दिले. खास बाब म्हणून राज्य आपत्कालीन निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आवश्यक निधी देण्यात यावा अशी आग्रही मागणी खा.संभाजीराजे यांनी केली.

मुंबई-पुणेच्या धर्तीवर कोल्हापुरातही जम्बो कोविड सेंटर उभारा -खासदार संभाजीराजे छत्रपती
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *