कोल्हापूर

प्रादेशिक सह आयुक्‍त पशुसवंर्धन विभाग पुणे यांची गोकुळ दूध संघास भेट

MahaNews LIVE
Sep 04 / 2020

कोल्‍हापूर : ता. ०४ प्रादेशिक सह आयुक्त डॉ.संतोष पंचपोर पशुसवंर्धन विभाग पुणे यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) दूध संघास सदिच्‍छा भेट दिल्‍याबद्दल गोकुळचे चेअरमन मा.श्री.रविंद्र आपटे यांच्‍या हस्‍ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. केंद्र पुरस्‍कृत राष्‍ट्रीय पशुरोग नियंञण कार्यक्रमा अंतर्गत कोल्‍हापूर जिल्‍ह्यामध्‍ये ०१ सप्‍टेंबर २०२० पासून लाळखुरकत रोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सुरु करण्‍यात आली आहे. त्‍याचा आढावा घेण्‍यासाठी व सध्‍या महाराष्‍ट्रात जनावरांमध्‍ये लंपीस्‍कीन डीसीज या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्‍याने पशुपालकांमध्‍ये जनजागृती करणेसाठी व त्‍यावरील प्रति‍बंधात्‍मक लसी संदर्भात माहिती देणेसाठी ते कोल्‍हापूर जिल्‍ह्याच्‍या दौ-यावर आले होते. गोकुळ दूध संघामार्फत दूध उत्‍पादक शेतक-यांसाठी राबविल्‍या जाणा-या सर्व योजनांची माहिती घेवून व संघामार्फत खासकरून राबवली जाणारी वासरूसंगोपन योजने बद्दल त्‍यांनी गोकुळ दूध संघाचे कौतुक करुन समाधान व्‍यक्‍त केले. यावेळी संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील (आबाजी), कार्यकारी संचालक श्री.डी.व्‍ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी श्री.एस.एम.पाटील, व्‍यवस्‍थापक प्रशासन श्री.डी.के.पाटील, जिल्‍हा उपायुक्‍त पशुसंवर्धन विभाग कोल्‍हापूर डॉ.पठाण, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी (जि.प.) डॉ.पवार, संघाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रादेशिक सह आयुक्‍त पशुसवंर्धन विभाग पुणे यांची गोकुळ दूध संघास भेट
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *