महत्वाच्या घडामोडी

रत्नागिरीला ७५ तर, सिंधुदुर्गास २५ कोटींची तातडीची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

MahaNews LIVE
Jun 07 / 2020

मुंबई : रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळामुळे फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीला ७५ कोटी रुपये आणि सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर केले. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे. मात्र तिथलाही आढावा घेतला जाईल, त्यानंतर निर्णय घेतला घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

रत्नागिरीला ७५ तर, सिंधुदुर्गास २५ कोटींची तातडीची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *